ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रिकाम्या पोटी लसणाचे पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत.
लसूण हा नैसर्गिक औषध म्हणून ओळखला जातो, ज्यामध्ये भरपूर पोषक घटक आणि औषधी गुणधर्म असतात.
लसणातील अँटिऑक्सिडंट्स आणि सल्फर संयुगे रक्तदाब कमी करण्यात मदत करतात.
लसणाचे पाणी पचन सुधारते, पोटातील गॅस कमी करते, आणि अन्न पचण्यास मदत करते.
लसणामध्ये फॅट बर्निंग गुणधर्म असतात. त्यामुळे लसणाचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते.
लसणातील अँटीबायोटिक आणि अँटीफंगल गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
लसणाचे पाणी श्वसनमार्ग स्वच्छ करते आणि सर्दी-खोकल्यावर आराम देते.
एका ग्लास कोमट पाण्यात २-३ लसणाच्या पाकळ्या ठेचून टाका. १०-१५ मिनिटे पाणी मुरु द्या. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या.
NEXT: कांद्याचे रस केसांसाठी आहे उपयुक्त, जाणून घ्या फायदे