Manasvi Choudhary & ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती, शिक्षक आणि शास्त्रज्ञ होते. अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून संबोधले जाते.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे आदर्श व्यक्तिमत्व आहे त्यांचे विचार तरूणांना प्रेरित करतात.
ं
शिक्षण सर्जनशीलता देते, सर्जनशीलता विचार करण्यास प्रेरित करते. विचार ज्ञान देते, ज्ञान आपल्याला महान बनवते.
स्वप्ने ती नाहीत जी तुम्ही झोपल्यानंतर बघता, स्वप्ने ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.
विद्यार्थांनी प्रश्न विचारायला हवेत . हा विद्यार्थाचा सर्वोत्तम गुण आहे.
आयुष्यात आनंदाचा अनुभव तेव्हाच येतो, जेव्हा ते आनंद अडचणीमधून मिळतो.
शिखर गाठण्यासाठी ताकद लागते. मग तो माउंट एव्हरेस्ट शिखर असो किंवा एखादे ध्येय.
दु:ख प्रत्येकाच्या आयुष्यात येते, या दु:खामध्येच प्रत्येकाच्या संयमाची परीक्षा होते.
'या जगात एखादाला पराभूत करणे खूप सोपे आहे, परंतु एखाद्याला जिंकणे तितकेच कठीण आहे,'
तुम्ही तुमच्या नियोजित ठिकाणी पोहोचेपर्यंत कधीही लढणे थांबवू नका.
देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरचं सापडतात.
यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही.