ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
श्रावण महिना सुरु झाला की, पहिला सण येतो तो नागपंचमी.
श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजे २१ ऑगस्ट २०२३ रोजी सोमवारी साजरी केली जाणार आहे.
प्रत्येक महिन्याच्या पंचमी तिथीला नाग देवताची पूजा केली जाते, परंतु, श्रावण महिन्यात येणाऱ्या पंचमी तिथीला नागपंचमी म्हणतात.
या दिवशी नाग देवता किंवा नागाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. हा दिवस नाग देवाला समर्पित आहे. नागपूजा हा आपल्या संस्कृतीचा आणि पंरपरेचा भाग आहे.
नागपंचमीला काय करू नये हे जाणून घ्या
नागपंचमीच्या दिवशी कामासाठी जमीन खोदू नये. असे केल्याने सापांचा बोळा किंवा बांबी माती किंवा जमिनीत तुटण्याची भीती असते.
नागपंचमीला जिवंत सापाला दूध देऊ नका. दूध हे सापांसाठी विषासारखे असू शकते, म्हणून त्यांच्या मूर्तीवरच दूध अर्पण करा.
नागपंचमीला चाकू, सुई यांसारख्या धारदार वस्तूंचा वापर करणे अशुभ मानले जाते. या दिवशी शिवणकाम, भरतकाम केले जात नाही.
नागपंचमीला लोखंडी पातेल्यात आणि तव्यात अन्न शिजवू नये. मान्यतेनुसार, भाकरी बनवण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी वस्तू ही सापाची फणा मानली जाते.