Shraddha Thik
झोपेच्या कमतरतेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळाची समस्या उद्भवते, असे लोकांना वाटते.
शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेपासून ते पाण्याच्या कमतरतेपर्यंत, यापैकी कोणत्याही कारणामुळे तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे होऊ शकतात.
अनेकांना झोपेच्या कमतरतेमुळे तर काहींना चांगला आहार न मिळाल्याने काळी वर्तुळे येतात. अशा स्थितीत बरेच लोक सल्ला देतात की जास्त झोपल्याने काळ्या वर्तुळापासून मुक्ती मिळू शकते.
बऱ्याच तज्ज्ञांचे असे मत आहे की,एखाद्या व्यक्तीला दररोज सुमारे 6 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. असे केल्यास चेहऱ्यावरील काळी वर्तुळे दूर होऊ शकतात.
पुरेशी झोप घेऊनही काळी वर्तुळे दूर होत नसल्याचेही अनेकदा दिसून आले आहे.
आपल्याला पुरेशा प्रमाणात पोषक तत्वांची आवश्यकता असते. कारण, त्यांच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावरील काळी वर्तुळे दूर करू शकता.
व्हिटॅमिन सीचे प्रमाण तुमचे रक्त परिसंचरण आणि कोलेजनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. यामुळे चेहऱ्याची त्वचा चांगली आणि चमकदार बनते. याशिवाय लोह, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई आणि लाइकोपीनची कमतरता देखील दूर करावी.