Sakshi Sunil Jadhav
रोजच्या जेवणात वरण-भातासोबत लोणच्याच्या एका तरी फोडीची गरज असते. याने साधं जेवणसुद्धा रुचकर बनतं.
आजच्या काळात हेल्दी डाएटच्या नावाखाली लोणच्याला अनहेल्दी ठरवलं जाते. अनेक जण लोणच्यामुळे हृदयविकार किंवा हाय ब्लड प्रशेरचा धोका वाढतो असा समज करतात.
न्यूट्रिशन एक्सपर्ट ऋजुता दिवेकर यांनी प्रभात खबरला दिलेल्या माहितीनुसार, पारंपरिक पद्धतीने घरी बनवलेलं लोणचं शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं.
घरच्या लोणच्यामध्ये नैसर्गिकरीत्या तयार होणारे चांगले बॅक्टेरिया (Gut Bacteria) तुमचं पचन सुधारतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
बाजारात मिळणाऱ्या पॅकेज्ड व प्रोसेस्ड लोणच्यामध्ये जास्त मीठ, तेल आणि केमिकल्स असतात. त्यांचं जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
लोणच्यात मीठ असतं हे खरं असलं तरी घरगुती लोणच्यात वापरलेलं सेंधव मीठ किंवा काळे मीठ तितकं घातक नसतं, असं दिवेकर सांगतात.
नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि पॅकेज्ड फूड टाळणं, थोड्या प्रमाणात लोणचे खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढत नाही.
कच्ची घाणी सरसों, शेंगदाणा, तीळ किंवा गिंगेली तेल वापरून तयार केलेलं लोणचं कमी प्रमाणात खाल्ल्यास हृदयासाठी अपायकारक ठरत नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.