Heart Attack: कमी पाणी प्यायल्याने हार्ट अटॅक येतो? ही 5 लक्षणं दिसल्यास समजा हृदयावर होतोय गंभीर परिणाम

Surabhi Jayashree Jagdish

शरीरात पाणी कमी झाल्यावर काय होतं?

पाणी शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित ठेवण्यास मदत करतं आणि त्यामुळे हृदयाचं काम सुरळीत चालतं. डिहायड्रेशन झाल्यावर शरीरातून घेतले जाणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त द्रव बाहेर पडतो. त्यामुळे शरीरातील द्रवाचं प्रमाण कमी होऊन रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो.

dehydration effects on heart | saam tv

हृदयाला जास्त मेहनत का घ्यावी लागते?

शरीरातील द्रवाचं प्रमाण कमी झाल्यावर रक्ताचं शरीरातील प्रमाणही कमी होऊ शकतं. रक्तप्रवाह आणि अवयवांना ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे शरीरात पाणी कमी असताना हृदयाला नेहमीपेक्षा जास्त काम करावं लागू शकतं.

lack of water symptoms | saam tv

सतत तहान लागणं

डिहायड्रेशनचे एक सामान्य लक्षण म्हणजे नेहमीपेक्षा जास्त तहान लागणं. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यावर तोंड कोरडं पडू शकतं. तहान आणि तोंडाचा कोरडेपणा जाणवत असेल तर शरीराला द्रवाची गरज असल्याचे हे संकेत असू शकतात.

water deficiency in body | saam tv

लघवीचा रंग गडद होणं

पाणी कमी प्यायल्यावर लघवी नेहमीपेक्षा गडद रंगाची दिसू शकते. त्याचबरोबर नेहमीपेक्षा कमी वेळा लघवी होऊ शकते. हे दोन्ही बदल शरीरात द्रवाची कमतरता झाल्याचे संकेत असू शकतात.

dehydration and blood circulation | saam tv

डोकेदुखी किंवा अशक्तपणा जाणवणे

डिहायड्रेशन झाल्यावर काही लोकांना डोकेदुखी जाणवू शकते. त्यासोबत थकवा किंवा शरीरात अशक्तपणाही जाणवू शकतो. अशी लक्षणं दिसत असतील तर शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असू शकतं.

dehydration heart rate | saam tv

उभं राहिल्यावर चक्कर येणं

डिहायड्रेशनमध्ये बसलेल्या किंवा झोपलेल्या अवस्थेतून उभं राहिल्यावर चक्कर येऊ शकते. शरीरातील द्रव कमी झाल्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उभं राहताना चक्कर येणं हे डिहायड्रेशनचं आणखी एक लक्षण असू शकतं.

increased heart rate dehydration | saam tv

हृदयाचे ठोके वाढणं

शरीरातील द्रव कमी झाल्यावर रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी हृदयाचे ठोके वाढू शकतात. त्यामुळे हृदयाची धडधड नेहमीपेक्षा जास्त जाणवू शकते. मात्र पुरेसं पाणी आणि विश्रांती घेतल्यानंतरही धडधड कमी होत नसेल तर डॉक्टरांची मदत घ्यावी.

dark urine dehydration | saam tv

CNG bike: CNG बाईकची रेंज किती? 2 किलो CNGमध्ये जाणून घ्या किती किमी धावते?

CNG bike | saam tv
येथे क्लिक करा