Dhanshri Shintre
भारतामधील क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे.
महाराष्ट्राचा एकूण भूभाग सुमारे ३ लाख ८ हजार चौरस किलोमीटर एवढा विस्तारलेला आहे.
महाराष्ट्र राज्यात एकूण ३६ जिल्हे आणि त्यामध्ये विभागलेले ३५८ तालुके असून, प्रशासनाचा विस्तृत आणि मजबूत पाया येथे पाहायला मिळतो.
महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे हे तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊया या खास माहितीतून.
महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटा जिल्हा म्हणजे मुंबई शहर असून, त्याचा विस्तार अत्यंत मर्यादित आहे.
मुंबई शहराचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ६०३.४ चौरस किलोमीटर असून, हे महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्ह्यांपैकी एक आहे.
मुंबईला केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर भारत देशाची आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते, कारण येथे अनेक मोठे व्यावसायिक केंद्रे आहेत.
रोजगार आणि स्वप्नपूर्तीच्या संधींसाठी देशभरातील लोक मुंबईत येतात, त्यामुळेच मुंबईला 'स्वप्ननगरी' असे प्रेमाने संबोधले जाते.