ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा आपल्या शरीरामध्ये काहीना काही हालचाली घडत असतात.
शरीरात घडणाऱ्या या हालचालींचा आपल्या भविष्यात देखील संबंध असतो.
वास्तुनुसार या हालचाली आपल्याला संकेत देत असतात.
आपण बऱ्याचदा आपल्या घरच्या व्यक्तींकडून ऐकले असेल की कोणता डोळा फडफडणे शुभ किंवा अशुभ आहे.
देशभरातले कही नागरिक डोळे फडफडणाऱ्या गोष्टीवर अंधविश्वास ठेवतात.
याबरोबर पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे शुभ मानले जाते. यामुळे त्यांना धनलाभ प्राप्त होईल असे मानतात.
तसेच स्त्रीच उजवा डोळा फडफडणे अशुभ संकेत आहे. याचे कारण म्हणजे की, स्त्री सोबत काही तरी वाईट घडणार आहे.
याबरोबर स्त्रीचा डावा डोळा फडफडणे शुभ आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: संध्याकाळी देवी लक्ष्मी येण्याची योग्य वेळ कोणती?