Priya More
सध्याच्या काळामध्ये मोजमाप करण्यासाठी ग्रॅम आणि किलोग्रामचा वापर केला जातो.
आपल्या आजीच्या काळातील जुनी मापने पद्धती सध्या अनेकांना माहिती नाही. त्यावेळी अतिशय अचूक मोजमाप करायचे.
पायली, शेर, मापटं, चिपटं, कोवळं, निळवं आणि चिवळं याचा वजनासाठी आणि मोजमाप करण्यासाठी वापर केला जात होता.
पायली म्हणजे चार शेर म्हणजे सात किलो असा अर्थ होतो.
अर्धा पायली (आडसरी ) म्हणजे दोन शेर म्हणजे साडे तीन किलो असा अर्थ होतो.
एक शेर म्हणजे अंदाजे दोन किलो असा अर्थ होतो.
मापटं म्हणजे अर्धा शेर म्हणजे साधारण एक किलो असा अर्थ होतो.
चिपटं म्हणजे पाव शेर म्हणजे साधारण अर्धा किलो (500 ग्रॅम) असा अर्थ होतो.
कोळवं म्हणजे पाव किलो म्हणजेच (250 ग्रॅम) असा अर्थ होतो.
निळवं म्हणजे आतपाव (125 ग्रॅम) असा अर्थ होतो.
चिळवं म्हणजे छटाक (50 ग्रॅम) असा अर्थ होतो.