Dhanshri Shintre
पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या ७१% भागावर पसरलेले ९६.५% पाणी महासागरांमध्ये आहे, जे पृथ्वीवरील जलसाठ्याचा मोठा हिस्सा आहे.
पृथ्वीवरील केवळ ०.००१% पाणी वाफेच्या रूपात सतत आकाशात फिरत राहते, हवामान आणि पर्जन्यचक्र नियंत्रित करते.
सर्व पाणी एकत्र होऊन पाऊस पडल्यास पृथ्वीवर फक्त १ इंच पाऊस पडू शकतो.
पृथ्वीवरील केवळ ३.५% पाणी गोडे असून, त्यात मीठाचे प्रमाण अत्यल्प आहे, बाकीचे पाणी खारे आहे.
शुद्ध पाणी तलाव व नद्यांमध्ये आढळते, तसेच भूगर्भात आणि हिमनद्यांमध्येही मोठ्या प्रमाणात साठवलेले असते.
गोड्या पाण्यातील ६८% भाग बर्फ व हिमनद्यांमध्ये असून, ३०% भूगर्भात साठलेले भूजल आहे, उरलेले पृष्ठजल आहे.
समुद्राच्या एका थेंबात लाखो सूक्ष्मजीव, जीवाणू आणि विषाणू असतात.
लाखो वर्षांपूर्वी, असंख्य धूमकेतूंनी पृथ्वीवर पाणी आणले असावे, ज्यामुळे जलस्रोतांचा प्रारंभ आणि पृथ्वीवरील जीवन शक्य झाला.
मानव शरीरात 55-60% पाणी असते, तर नवजात बाळाच्या शरीरात हे प्रमाण ७८% पर्यंत असते.