ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आज आपण अशा एका अनोख्या गावाची माहिती जाणून घेणार आहोत, जे जगातील सर्वात लहान गाव मानले जाते.
अमेरिकेतील मोनोवी हे गाव एक अपवादात्मक उदाहरण आहे, कारण ते जगातील सर्वात लहान गाव मानले जाते.
फक्त एक रहिवासी असतानाही मोनोवी गावात बार, लायब्ररीसारख्या मूलभूत सुविधा आजही उपलब्ध आहेत.
मोनोवी गावात एकच ९० वर्षीय वृद्ध महिला राहते, जी सर्व जबाबदाऱ्या एकटी हाताळते आणि गावाची देखभाल करते.
या गावात राहणाऱ्या एकमेव महिलेचं नाव एल्सी आयलर असून ती संपूर्ण गावाची जबाबदारी सांभाळते.
२०२० मधील जनगणनेनुसार, त्यावेळी मोनोवी गावातील एकमेव रहिवासी एल्सी आयलर यांचे वय ८६ होते.
मोनोवी गावातील सर्व कामे आणि जबाबदाऱ्या एल्सी आयलर स्वतःच एकटी पार पाडतात.
प्रशासकीय कामांपासून ते बार चालवणे आणि लायब्ररी सांभाळणे अशी सर्व कामं एल्सी स्वतःच पार पाडतात.