ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमच्या घरात कार आहे का? त्या गाडीच्या नंबर प्लेटचा रंग काय?
भारतातील गाड्यांसाठी जवळपास सहा रंगाच्या नंबर प्लेट्स असतात. यात पांढरा, पिवळा, लाल, हिरवा, काळा आणि निळा रंगाच्या नंबर प्लेटचा समावेश होतो.
जर नंबर पिवळ्या प्लेटवर काळ्या शाईने लिहिले गेले असेल तर अशा वाहनाला कमर्शियल वाहन म्हटले जाते. अशा प्रकारचा रंग तुम्हाला ट्रक किंवा टॅक्सीवर दिसून येईल. या वाहनांमध्ये प्रवासी तुम्हाला दिसतील किंवा त्यामध्ये मालवाहतूक होताना दिसेल.
पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट सामान्य वाहनांचे प्रतिक आहे. या वाहनांचा कमर्शियल वापर होऊ शकत नाही. या प्लेटवर काळ्या रंगाने नंबर्स लिहिले जातात, तसेच हे वैयक्तिक वाहन आहे, याचा अंदाज सर्व जण सहज लाऊ शकतात.
इलेक्ट्रीक वाहनांची नंबर प्लेट हिरव्या रंगाची असते. शून्य उत्सर्जन असलेल्या इलेक्ट्रीक वाहनांसाठी ही प्लेट खास उपलब्ध असते.
अशी वाहने तुम्हाला चालवण्यासाठी भाड्याने दिल्या जातात. या वाहनांना काळ्या रंगाची प्लेट आणि त्यावर पिवळ्या रंगाच्या अक्षरांमध्ये लिहिलेले असते. मोठ्या हॉटेल्सच्या ट्रान्सपोर्टसाठी असलेल्या वाहनांवर तुम्हाला अशा प्रकारची नंबर प्लेट्स दिसतील. या ड्रायव्हर्सना व्यावसायिक ड्रायव्हिंग परमिट नसल्यास या कार व्यावसायिक वाहन म्हणून चालू शकतात.
लष्करी वाहनांसाठी वेगळ्या क्रमांक प्रणालीचा वापर केला जातो. रजिस्ट्रेशन प्लेटमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या कॅरेक्टरनंतर वरच्या बाजूस दर्शविणारा बाण आहे, जो ब्रॉड ॲरो म्हणून ओळखला जातो. बाणापुढे येणारे अंक हे वर्ष दर्शवतात, ज्या वर्षी ते वाहन विकत घेतलेले असते. सिरियल नंबरनंतर समाप्त होणारे लेटर वाहनाचा क्लास दर्शवते.
परदेशी प्रतिनिधींसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर निळ्या रंगाची नंबर प्लेट वापरली जातात. या गाडीतून केवळ परदेशी राजदूत प्रवास करु शकतात.
लाल रंगाची नंबर प्लेट ही फक्त राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या गाड्यांसाठी राखीव ठेवलेली असते. या नंबर प्लेटमध्ये क्रमांकाऐवजी अशोक चक्र असते. याशिवाय लाल रंगाची नंबर प्लेट ही एखाद्या कार निर्माती कंपनी चाचणी किंवा प्रमोशनसाठी रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांवरही असते. या वाहनांना त्यावेळी तात्पुरता नंबर दिला जातो.