साम टिव्ही ब्युरो
शरीराची ठेवण आणि उठण्या बसण्याच्या पध्दतीवरून तुमचा स्वभाव हा ओळखला जातो.
तुमची बसण्याची पध्दत ही तुमच्या बॉडी लँग्वेजचा भाग आहे.
तुम्ही काही लोकांना पायावर पाय ठेवून, क्रॉस करून बसलेले बघितले असाल. असे लोक फार सर्जनशील असतात.
जे लोक खुर्चीवर बसताना पाय खाली जमीनीवर सरळ ठेवून बसतात. असे लोक शिस्तप्रिय असतात आणि वेळेचे पालन करतात.
काही लोक खूर्चीवर बसताना गुडघे एकमेकांना टेकवून तर पंजांमध्ये भरपूर गॅप ठेवून बसतात. असे लोक जबाबदारीपासून पळ काढतात.
जे लोक पाय वरून खुले आणि पंजे, टाचा जोडून बसतात. ते एक आरामदायक जीवन जगतात. फार ताण घेत नाहीत.
जे लोक पायांना एकदम चिपकवून ठेवतात आणि खुर्चीवर थोडे तिरपे होऊन काम करतात असे लोक व्यवहारात थोडे जिद्दी मानले जातात.