Surabhi Jayashree Jagdish
धान्याचे दाणे उचलून घरात नेणं असो किंवा आपल्या मरण पावलेल्या साथीदारांना उचलून नेणं असो, मुंग्या रोज काही ना काही काम करत असतात.
पण कधी आपण विचार केला आहे का की या मुंग्या जेव्हा सतत काम करतात, तेव्हा त्या आराम कधी करतात? त्यांना झोपेची गरज भासत नाही का हा प्रश्न अनेकांना पडतो.
आज आपण हाच प्रश्न सोडवणार आहोत की मुंग्या खरोखर झोपतात का नाही. हा प्रश्न वैज्ञानिकदृष्ट्या देखील विचारला गेला आहे. आता त्याचे स्पष्ट उत्तर पाहूया.
मुंग्या झोप घेतात, पण त्या मानवांप्रमाणे सलग तासन्तास झोपत नाहीत. त्यांची झोपेची पद्धत वेगळी असते. त्या थोड्या-थोड्या विश्रांतीत झोप पूर्ण करतात.
मुंग्या एका दिवसात अंदाजे 250 वेळा छोटी झोप घेतात. या झोप काही सेकंदांपासून काही मिनिटांपर्यंत असू शकतात. अशा प्रकारे त्या शरीराला वेळोवेळी आराम देतात.
या सगळ्या झोपेच्या वेळेची बेरीज केली तर त्या दिवसभरात सुमारे 4 तास 48 मिनिटे झोप घेतात. म्हणजेच त्यांनाही पूर्ण विश्रांतीची गरज असते.
मुंग्या एकावेळी काही सेकंदांपासून काही मिनिटांपर्यंत झोप घेतात. या झोपेत त्यांचं शरीर रिलॅक्स होतं. त्यामुळे त्यांना पुन्हा काम करण्याची ऊर्जा मिळते.
जेव्हा एखादी मुंगी झोपलेली असते, तेव्हा तिच्या वसाहतीतील इतर मुंग्या एक्टिव्ह असतात. त्या दैनंदिन काम सुरूच ठेवतात.