ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्याला नेहमीच चित्रपटसृष्टीतील कलाकारांविषयी माहिती जाणून घ्यायची असते.
तसेच चाहत्यांना त्यांच्या वैयक्तिक जीवनशैलीत ते कसे राहतात, वागतात हे जाणून घ्यायचे असते.
बॅलिवूडमधील काही प्रसिद्ध कलाकारांनी आपल्या नावामध्ये बदल केला आहे. जाणून घेऊया त्या कलाकारांची खरी नावे.
दुनिया, विधाता आणि बऱ्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे नाव युसुफ खान होते.
अभिनेत्री मीना कुमारी यांनी अनेक चित्रपटात प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांचे खरे नाव महजबीन बानो होते.
दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत थलाइवा म्हणून प्रसिद्ध असणारे सुपरस्टार रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड होते.
मर्द, डिस्को डान्सर, फूल और अंगार अशा अनेक चित्रपटांसाठी ओळखले जाणारे मिथुन चक्रवर्ती यांचे नाव गौरांग होते.
बॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी तिचे खरे नाव आधी आलिया अडवाणी होते.
बॅलिवूडमधील सुपरस्टार आयुष्मान खुराना त्याचे आधी नाव निशांत खुराना असे होते.
NEXT: JOB या शब्दाचा फुलफॉर्म काय? तुम्हाला माहितीये का?