ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुलींच्या उज्वल भविष्यासाठी महाराष्ट्राच्या राज्य सरकारकडून लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली.
लेक लाडकी योजना महाराष्ट्रात १ एप्रिल पासून सुरु झाली. या योजनेमध्ये मुलींना १ लाख १ हजार रुपये मिळणार अशी माहिती तरतूद उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.
मुलगी जन्माला आल्यापासून ते सज्ञान होईपर्यंत तिला या योजनेमार्फत मदत केली जाणार आहे.
लेक लाडकी योजनेचा लाभ गरीब कुटुंबामधील मुलींना मिळणार आहे. जन्मापासून ते १८ वर्षापर्यंत टप्याटप्यामध्ये सरकारकडून योजनेअंतर्गत मदत केली जाईल.
लेक लाडकी योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांच्या मुली घेऊ शकतात.
जनेनुसार, जन्मानंतर मुलीला 5000 रुपये देण्यात येतात. त्यानंतर इयत्ता पहिलीत गेल्यानंतर 6000 रुपये, सहावीत 7000 रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर 8000 रुपये मिळणार.
मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला रोख 75 हजार रुपये देण्यात येतील, अशी तरतूद राज्य सरकाडून करण्यात आली आहे.