Dhanshri Shintre
हिंदू धर्मात तुळशीचे पूजन शुभ मानले जाते, मात्र रोप सुकल्यास त्याला अशुभ संकेत मानले जाते.
सुकलेली तुळस लक्ष्मीमातेचा अप्रसन्नतेचा संकेत मानली जाते, म्हणून तिची योग्य देखभाल करणे आवश्यक मानले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार सुकलेली तुळस फेकून देणे अयोग्य मानले जाते, कारण तिचा आदरपूर्वक व्यवहार आवश्यक असतो.
सुकलेल्या तुळशीच्या रोपाचा योग्य उपयोग करून धनप्राप्ती आणि लक्ष्मीमातेचा आशीर्वाद मिळवता येतो, असे धार्मिक मान्यता सांगतात.
सुकलेल्या तुळशीच्या देठाचे सात तुकडे करून त्यावर पांढरा धागा गुंडाळा आणि शुद्ध तुपात ते भिजवा.
एकादशीला भगवान विष्णूसमोर तुळशीच्या देठाचा दिवा लावून पूजा केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात, असे मानले जाते.
तुळशीचे सुकलेले देठ वापरून दिवा लावल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते, असं मानलं जातं.
या दिव्यामुळे रोगांपासून बचाव होतो आणि कुटुंबातील सर्वांचे आरोग्य टिकून राहण्यास मदत होते, असे मानले जाते.