Priya More
रस्त्यात जर मांजर आडवी गेली तर काही लोकं काही वेळ थांबतात किंवा त्यांचा मार्ग बदलतात.
मांजर रस्त्यात आडवी गेल्यावर त्या वाटेने जाऊ नये अन्यथा काही अनुचित घटना घडते असा समज आहे.
काही देशांमध्ये मांजर शुभ मानली जाते तर कुठे अशुभ. पण मांजरीने रस्त्या ओलांडण्यामागे अंधश्रद्धा किंवा भ्रम मानले जाते.
पण खरं तर मांजर आडवी गेल्यावर काही काळ थांबावे असे म्हटले जाते तर त्या मागे वैज्ञानिक कारण आहे.
मांजर रस्त्यात आडवी गेल्यावर थांबावे ही परंपरा रात्रीपासून सुरू होते. यामागे खरं तर वेगळेच कारण आहे.
पूर्वीच्या काळी लाईट नव्हती तेव्हा रस्त्यात कोणताही आवाज आला की लोक थांबायचे. जेणेकरून एखादा जंगली प्राणी रस्ता ओलांडत असेल तर तो आरामात रस्ता ओलांडू शकेल.
तसंच तो प्राणी आपल्याला काहीच नुकसान पोहचवू नये यासाठी थांबण्याची परंपरा होती. पण ती नंतर काळ्या मांजरीशी जोडली गेली.
ही परंपरा सुरु होण्यामागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे काही दशकांपूर्वी देशात प्लेगचा आजार पसरला होता. त्यावेळी मांजर आडवे गेल्यावर लोकं थांबायचे.
त्यामागचे मुख्य कारण म्हणजे प्लेगच्या महामारीत अनेक लोकांचा मृत्यू झाला. हा आजार उंदरांमुळे पसरला होता आणि मांजर उंदीर खातात.
मांजराच्या माध्यमातून प्लेगचा संसर्ग होऊ नये यासाठी लोकं त्यांच्यापासून काही अंतर ठेवून चालायचे. त्या रस्त्यातून आडव्या गेल्यावर ते तिथेच काही वेळ थांबायचे.