Sleep Facts: तुम्हाला पण रात्री झोपेत अचानक दचकून जाग येते का? जाणून शास्त्रीय कारण

Dhanshri Shintre

हिप्निक जर्क

रात्री झोपेत अचानक दचकून जाग येणे, ज्याला हिप्निक जर्क (hypnic jerk) म्हणतात.

मेंदूची प्रतिक्रिया

झोपेत अचानक दचकून उठण्यामागे मेंदूची प्रतिक्रिया, तणाव, थकवा आणि नैसर्गिक स्नायूंची हालचाल कारणीभूत असते.

शास्त्रीय कारण

झोपेत अचानक दचकून उठण्यामागे शास्त्रीय कारण असून, मेंदू आणि शरीरातील हालचालींमुळे ही प्रतिक्रिया होते.

नैसर्गिक प्रक्रिया

तज्ज्ञ सांगतात की झोपेत दचकून उठणे ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया असून ती आरोग्यास घातक नाही.

विश्रांतीच्या प्रक्रियेत प्रवेश

झोपेत गेल्यावर आपल्या शरीराच्या हालचाली धीम्या होतात आणि शरीर विश्रांतीच्या प्रक्रियेत प्रवेश करतं.

हालचाली मंदावतात

झोपेत असताना शरीराच्या हालचाली मंदावतात आणि त्याचबरोबर हृदयाचे ठोकेही हळूहळू कमी होतात.

मेंदूला मृत्यूची भीती वाटते

शरीराची हालचाल मंदावल्यानं मेंदूला मृत्यूची भीती वाटते आणि तो शरीराला वीजेसारखा झटका देतो.

अचानक दचकतो

मेंदूने दिलेल्या झटक्यामुळे झोपेत असताना आपण अचानक दचकतो आणि जागे होतो.

मानसिक तणाव

मानसिक तणाव किंवा चिंता असल्यास मेंदू झोपताना जास्त सतर्क राहतो, त्यामुळे दचकून उठण्याची शक्यता वाढते.

NEXT: चेहरा आणि शरीरावर सन टॅन कसा दूर करावा? जाणून घ्या ५ घरगुती उपचार

येथे क्लिक करा