Priya More
घरात झुरळे झाल्यामुळे अनेक जण त्रस्त असतात. या झुरळांमुळे घरामध्ये आजारपण सुद्धा येते.
घरामध्ये असणाऱ्या झुरळांवर योग्य वेळी उपाय केले नाही तर त्यांची संख्या वाढत जाते. त्यामुळे काही घरगुती उपाय करुन झुरळांना पळवून लावा.
काकडीचा सुगंध झुरळांना आवडत नाही. त्यासाठी काकडीचा रस काढून तो रस झुरळांवर शिंपडा. यामुळे झुरळं पळून जातात.
दालचिनी पावडर घरात ज्या ठिकाणी झुरळे आहेत त्याठिकाणी शिंपडा. त्यानंतर झुरळ पुन्हा त्याठिकाणी येणार नाही.
एक लिटर गरम पाण्यात २ चमचे बेकिंग सोडा आणि एक लिंबू पिळा. आता हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरून झुरळांवर शिंपडा.
बेकिंग सोडा साखरेमध्ये मिक्स करा. हे मिश्रण घरातल्या ज्या कोपऱ्यांमध्ये झुरळ येतात तिथे टाका. यामुळे झुरळ मरतात.
घरातील झुरळे दूर पळवून लावण्यासाठी कडुलिंबाचे तेल खूप चांगले मानले जाते. हे तेल घरामध्ये तुम्ही शिंपडू शकता.
कडुलिंबाची पाने वाटून पाण्यात मिक्स करा. हे पाणी एका स्प्रे बाटलीत भरुन ठेवा. घरात जिथे झुरळ आहेत त्या ठिकाणी हे पाणी शिंपडा.
तमालपत्र झुरळांना पळवून लावण्यासाठी फायदेशीर आहे. तमालपत्राची पाने कपाट, गॅस, किचन, सिंकखाली ठेवा.
काळीमिरी, कांदा आणि लसणाची पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट पाण्यात मिक्स करा. हे पाणी झुरळांवर शिंपडा.