Manasvi Choudhary
थंडीचा महिना सुरू झाला की आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
लाल गुलाबी ओठ असावेत असं प्रत्येक मुलीला वाटतं.
थंडीमध्ये ओठ फाटणे, कोरडे पडणे यासारंख्या बऱ्याच समस्या निर्माण होतात.
ओठ थंडीने उकलतात आणि फाटतात. बऱ्याचदा यातून रक्तस्राव देखील होतो.
अशावेळी घरच्या घरी तयार केलेली दूधावरची साय तुम्ही वापरू शकता.
यासह तुम्ही ओठांना मध देखील लावू शकता.
ओठ सतत उकलत असतील तर तूप आणि हळद यांची पेस्ट रोज रात्री झोपताना ओठांना लावा.
या सर्वांसह तुम्ही बाजारात मिळणारी निवया सॉफ्ट ही क्रीम देखील वापरू शकता. ही क्रीम देखील फार फायदेशीर आहे.