Surabhi Jayashree Jagdish
घराचा आरसा नेहमी अशा ठिकाणी ठेवावा ज्यामध्ये शुभ गोष्टींचे प्रतिबिंब दिसतं. जर तुमच्या घरी चुकीच्या जागी आरसा ठेवला असेल तर घरात गरिबी येऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार, घरात कधीही पाच ठिकाणी आरसा लावू नये. असे केल्याने तुमच्या घरातील सुख-समृद्धीवर विपरीत परिणाम होऊ शकतात.
तुमच्या घरातील बेडरूममध्ये कधीही बेडच्या अगदी समोर आरसा नसावा. त्यामुळे पती-पत्नीमध्ये तणाव निर्माण होण्याचा धोका असतो.
घराच्या पश्चिमेला किंवा दक्षिणाभिमुख भिंतीवर आरसा लावू नये.
आरसा लावताना लक्षात ठेवा की तो फार उंचीवर नसावा. यामुळे घरात आजारपण येऊ शकतं.
वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये गोल आकाराचा आरसा शुभ मानला नाही. घरामध्ये आयताकृती किंवा चौकोनी आरसा असावा.
घरात धुसर किंवा तुटलेला आरसा असेल तर तो लगेच काढून टाका. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते.