Surabhi Jayashree Jagdish
हिंदू धर्मामध्ये मकर संक्रातीला विशेष महत्त्व आहे. आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
शास्त्रांनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान केल्याने अनेक फायदे होतात. शिवाय, सूर्य देवाची प्रार्थना केल्याने कुंडलीतील अनेक दोष दूर होतात आणि सूर्याची स्थिती मजबूत होते. त्यामुळे या दिवशी कोणते चुका टाळल्या पाहिजेत ते पाहुयात.
मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र घरी स्नान करण्याचं विशेष महत्त्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, आंघोळ केल्यानंतरच खाणं शुभ मानले जाते. आंघोळ न करता अन्न खाणे अशुभ मानलं जातं.
या दिवशी दान करणं खूप महत्वाचे आहे. मात्र या दिवशी परंतु तेल दान करणं अशुभ मानण्यात येतं. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
मकर संक्रांतीला पांढरे तांदूळ आणि चाकू किंवा कात्रीसारख्या तीक्ष्ण वस्तूंचं दान करू नये. यामुळे जीवनात अडथळे येऊ शकतात. तीळ, गूळ, धान्य आणि कपडे दान करा.
मकर संक्रांतीच्या दिवशी कोणावर रागावणं किंवा एखाद्याचा अपमान करणं अशुभ मानलं जातं. या दिवशी प्रेम, शांती आणि आदराने इतरांशी वागलं पाहिजे.
हा सण पवित्रतेचं प्रतीक आहे. या दिवशी मांस, मासे आणि दारू यांसारखे तामसिक पदार्थांचं सेवन करू नये. सात्त्विक अन्न खाल्ल्याने मन आणि शरीर दोन्ही शुद्ध होतं.