Surabhi Jayashree Jagdish
आजच्या जीवनशैलीत आपण जेवण करण्यापूर्वी बहुतेक वेळा ते गरम करूनच खातो. कारण गरम अन्न अधिक चविष्ट आणि ताजं वाटतं असं आपल्याला वाटतं. मात्र ही सवय आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही.
अन्न दुसऱ्यांदा गरम केल्यास त्यातील आवश्यक पोषक तत्त्वं कमी होतात. त्यामुळे शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही. हळूहळू याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.
मात्र असे कोणते अन्नपदार्थ आहेत जे पुन्हा गरम केल्यास शरीरासाठी घातक ठरू शकतात. अशा पदार्थांचा वापर करताना विशेष सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. यामुळे पचनासंबंधी समस्या उद्भवू शकतात.
शिजवलेला भात पुन्हा गरम करून खाल्ल्यास अनेक त्रास सुरू होऊ शकतात. त्यामध्ये पोटात गॅस होणं, उलटी होणं आणि फूड पॉइझनिंग यांचा समावेश होतो. त्यामुळे भात शक्यतो ताजा किंवा एकदाच गरम केलेला खावा.
पालकमध्ये नैसर्गिकरीत्या नायट्रेटचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ते पुन्हा गरम केल्यास नायट्राइट तयार होतो, जो शरीरासाठी हानिकारक असतो.
मशरूममध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आढळतं. त्यामुळे ते पुन्हा गरम केल्यास प्रोटीनची रचना बदलते आणि अपचन, पोटदुखी व गॅस यांसारख्या समस्या निर्माण होतात. म्हणून मशरूम नेहमी ताजे शिजवून लगेच खाणे योग्य असते.
चिकन पुन्हा गरम करून खाल्ल्यास पोट जड वाटू शकते आणि पचन नीट होत नाही. तसंच यामुळे शरीरात चरबी वाढण्याची शक्यता असते.
चिकनप्रमाणेच उकडलेलं किंवा तळलेलं अंडेही पुन्हा गरम करून खाणं टाळावं. कारण अंडे पचवण्यासाठी शरीराला जास्त वेळ लागतो.