Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर नेहमीच आपल्या सालस अभिनयाने चाहत्यांची मने जिंकत असते.
ज्ञानदा रामतीर्थकरने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
ज्ञानदा सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत ती काव्या हे पात्र साकारत आहे.
ज्ञानदाने याआधीही अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्यातील एक मालिका म्हणजे ठिपक्यांची रांगोळी.
ज्ञानदाने नुकतेच नऊवारी साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.
लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत मंगळागौरीचं शूट सुरु आहे. त्यासाठी तिने हा लूक केला आहे.
ज्ञानदाने जांभळ्या रंगाची सुंदर काठपदर नऊवारी साडी नेसली आहे.
ज्ञानदाने या साडीवर छान मोहनमाळ आणि सुंदर नेकलेस घातला आहे.
ज्ञानदाने कानात बुगडी आणि नाकात सुंदर नथ घातली आहे.
ज्ञानदा रामतीर्थकर या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्याचे चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे.