Manasvi Choudhary
दिवाळी पहाट आणि ठाणे हे समीकरण दरवर्षी दिवाळीला पाहायला मिळते. दिवाळीचा महिना सुरू होताच संपूर्ण ठाण्यात सजावट करतात.
दिवाळीत दिवाळी पहाटसाठी तरूण- तरूणी ठाण्यातील राम मारूती रोडला भेट देतात.
सामाजिक संस्था, राजकीय पक्षाकडून ठाण्यात दिवाळी पहाटचे भव्य असे आयोजन करण्यात येते.
यावर्षी देखील दिवाळी पहाटसाठी ठाणेनगरी सजली आहे. मुंबईतून देखील तरूण- तरूणी ठाण्यामध्ये खास भेट देतात.
सुरांच्या संगीतमय वातावरणात येथे मोठे- मोठे कार्यक्रम या दिवशी साजरे होतात.
ठाण्यात दिवाळी पहाटला असंख्य तरूण- तरूणी पारंपारिक पोशाखात डिझेच्या तालासुरात नाचतात.
जल्लोषमय वातावरणात दिवाळीच्या पहिल्या दिवशी येथे मोठी गर्दी होते. अनेक सेलिब्रिटी देखील दिवाळी पहाटला भेट देतात.