Diwali Cleaning : दिवाळीच्या साफसफाईची योग्य सुरुवात, आधी घरातून बाहेर काढा या अनावश्यक वस्तू

Saam Tv

दिवाळीची खास तयारी

या दिवाळीला घर स्वच्छ करताना कोणत्या अनावश्यक गोष्टी बाहेर फेकून द्याव्यात, ते जाणून घ्या.

diwali cleaning | pinterest

साफसफाईचे महत्त्व आणि तयारी

दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. या सणाला घराची सुंदर रोषणाई, नवीन कपडे आणि मिठाईने आनंद पसरतो. महिनाभर आधीपासूनच स्वच्छता सुरू होते. साठवून ठेवलेल्या सर्व अनावश्यक वस्तू बाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे.

diwali cleaning | pinterest

लिव्हिंग रूममधून काय बाहेर टाकावे?

जुन्या निमंत्रण पत्रिका, व्हिजिटिंग कार्ड्स, मॅगझिन्स आणि फिकट झालेली बिले.अकार्यक्षम रिमोट, जुने चार्जर, एका बाजूने चालणारे इअरफोन आणि जुन्या बॅटऱ्या. न चालणारे पेन, जुन्या चाव्या, तुटलेल्या खुर्च्या, तुटलेली छत्री व खराब हेल्मेट.

diwali cleaning | pinterest

किचनमधील कचरा आणि टाकाऊ वस्तू

झाकण नसलेले प्लास्टिक डबे, रिकाम्या जॅम-लोणच्याच्या बाटल्या व किराणा पिशव्या.एक्सपायर झालेले मसाले, सॉस पाऊच आणि फ्रिजमधील शिजवलेले जुने अन्न.खराब झालेले चॉपर, न चालणारे मिक्सर जार, बंद पडलेली उपकरणे व फाटलेले कपडे.

diwali cleaning | pinterest

बेडरूमची स्वच्छता आणि क्लटर-फ्री

कधीच न वापरलेले जुने कपडे, एकच उरलेला मोजा .फाटलेल्या बेडशीट, उशांची जुनी कव्हर्स आणि पोछ्यासाठी ठेवलेले जुने कपडे. परफ्यूमच्या रिकाम्या बाटल्या, दागिन्यांचे व घड्याळांचे रिकामे बॉक्स.

diwali cleaning | pinterest

बाथरुममधून फेकून द्यायच्या वस्तू

संपलेली टूथपेस्ट, जुने टूथब्रश, रिकाम्या शाम्पूच्या बाटल्या व एक्सपायर्ड प्रॉडक्ट्स. तुटलेली बादली व मग, खराब झालेले लोफा, स्क्रबर आणि साबणाचे जुने डबे.वापरत नसलेले जुने टॉवेल, जुने बाथरुम ब्रशेस आणि क्लिनिंगच्या रिकाम्या बाटल्या.

diwali cleaning | pinterest

घरातील इतर भागांमधील टाकाऊ वस्तू

पार्सलचे जुने डबे, रंगाचे रिकामे डबे आणि न वापरलेले जुने सुटकेस.गेल्या वर्षीच्या तुटलेल्या लायटिंग माळा, सुकलेली फुले व रिकाम्या कुंड्या.तुटलेले गॉगल आणि "कधीतरी कामाला येईल" म्हणून वर्षानुवर्षे जपून ठेवलेल्या वस्तू.

diwali cleaning | pinterest

घर स्वच्छ करा

दिवाळीच्या या शुभप्रसंगानिमित्त घरातील सर्व टाकाऊ वस्तू बाहेर काढून टाका आणि आपल्या घरात आनंद, आरोग्य आणि समृद्धीचे स्वागत करा.

diwali cleaning | pinterest

NEXT : जुन्या बांगड्यांना म्हणा अलविदा, यंदाच्या फेस्टिव्हलला ट्राय करा या स्टायलिश जेली बँगल्स

Wear 'these' stylish jelly bangles for the festive season | saam tv
येथे क्लिक करा