Bharat Jadhav
बहुतेक कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळालाय. बोनस मिळाल्यामुळे दिवाळीचा आनंद अधिक वाढला.
सर्वांच्या खात्यात दिवाळी बोनस आला असेल. कंपनी असो, की सोसायटी प्रत्येक ठिकाणच्या चर्चेत बोनसचा विषय असतो. किती बोनस मिळाला असा प्रश्न सर्वत्र ऐकू येतो.
बोनस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनो, तुम्हाला जो बोनस मिळालाय. तो बोनस मिळण्याची पंरपरा कधीपासून सूरू झाली, याची माहिती आहे का?
बोनसचा इतिहास हा ब्रिटीश काळापासून सुरू होतो. ज्यावेळी मजुरांना दर आठवड्याच्या हिशोबानं पगार दिला जात होता. तेव्हापासून याची सुरुवात झाली.
आधी मजुरांना दर आठवड्याला पगार दिला जात होता. वर्षभरातील 52 आठवड्यांचा हिशोबाने मुजरांना 52 वेळा पगार मिळतो. हा अधिक पगार दिला जात असल्याने ब्रिटिश सरकारनं मासिक वेतनाची सुरुवात केली.
मजुरांना जेथे 52 वेळा पगार मिळतो होता, तेथे त्यांना 12 वेळा पगार मिळू लागला. म्हणजे किमान 4 आठवड्यांचा पगार कमी झाला, ही बाब लक्षात येताच मजुरांमध्ये नाराजी वाढली.
मजुर नाराज असल्यानं ब्रिटीश सरकारने 1940 मध्ये एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला. तो म्हणजे, मजुरांना एक वाढीव पगार देण्याचा. म्हणजे मजुरांना 12 महिन्याचा पगार देण्याऐवजी 13 महिन्याचा पगार द्यायचा. त्याला 13 व्या महिन्याचा पगार असं नाव देण्यात आलं.
भारतात सर्वोत मोठा सण म्हणजे दिवाळी. या सणाच्या दिवसात अनेकजण नव्या वस्तूंची खरेदी करत असतात. त्यामुळे हा अतिरिक्त पगार दिवाळीला दिला जात होता, त्यामुळे याला दिवाळी बोनस म्हटलं जातं.
आधी ही रक्कम भेट म्हणून समजली जात होती. नंतर ही रक्कम म्हणजे आपला हक्क आहे असा आवाज मजुरांमधून उठू लागला. त्यासाठी कामगार संघटना उद्यास आल्या. अखेर 1965 मध्ये Payment of Bonus Act ची निर्मिती करण्यात आली.