Manasvi Choudhary
हिंदू धर्मात भाऊबीज हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला हा सण साजरा केला जातो.
भाऊबीज दिवशी बहिणी आपल्या भावाला तिलक करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी, सुख समृद्धीसाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करतात.
यंदा भाऊबीज गुरुवार २३ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. ही तिथी यम द्वितीया म्हणूनही ओळखली जाते.
भाऊबीज करताना ताटात कोणत्या गोष्टी असायल्या हवेत.
भाऊबीज करताना कुंकू ताटात असायला हवा. भावाला कुंकू लावल्याने प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं.
हळद आणि कुंकू सौंख्य- सौभाग्याचं प्रतीक मानले जाते त्यामुळे पुजेच्या ताटात असायला हवं.
भावाच्या दिर्घायुष्यासाठी ताटात अक्षता म्हणजेच तांदूळ असायला हवेत.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.