Diwali 2025: दिवाळीत मातीच्या पणत्यांचा उपयोग का करावा? जाणून घ्या ५ प्रमुख कारणे

Dhanshri Shintre

मातीच्या पणत्या

दिवाळीत मातीच्या पणत्या लावणे अत्यंत शुभ मानले जाते; याला पारंपरिक महत्व असून सणाच्या आनंदात वाढ होते.

स्वागतासाठी

माहितीनुसार प्रभू रामचंद्र वनवासानंतर अयोध्येला परतल्यावर लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी मातीच्या पणत्या लावल्या होत्या.

प्रकाश पसरवतो

दिवा अंधार दूर करतो आणि प्रकाश पसरवतो, जो वाईटावरील चांगल्या व अज्ञानावरील ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक मानला जातो.

ग्रहदोष दूर होतात

ज्योतिषानुसार, मातीचा संबंध मंगळ ग्रहाशी आणि मोहरीच्या तेलाचा शनी ग्रहाशी जोडलेला आहे. मातीची पणती व मोहरी तेल वापरल्यास ग्रहदोष दूर होतात आणि शुभ परिणाम मिळतात.

पंचतत्त्व प्रतीक

मातीची पणती माती व पाण्याचे पंचतत्त्व प्रतीक मानली जाते. पणती लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा पसरते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात.

घरात अंधार नसावा

दिवाळीच्या काळात घरात अंधार नसावा, अशी श्रद्धा आहे. सर्वत्र पणत्या लावल्यास घर उजळते आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, असे मानले जाते.

उत्पन्न मिळते

मातीच्या पणत्या खरेदी केल्याने कुंभारांना व्यवसायातून उत्पन्न मिळते आणि सण आनंदात साजरा होतो. ही सामाजिक जबाबदारी जपण्याची एक परंपरा मानली जाते.

शांत प्रकाश

इलेक्ट्रॉनिक दिव्यांच्या तुलनेत, मातीच्या पणतीचा हलका आणि शांत प्रकाश जास्त तृप्तिदायक असतो आणि घरात मंगलमय आणि आनंददायी वातावरण निर्माण करतो.

सकारात्मक ऊर्जा

वास्तुशास्त्रानुसार, घरात मातीच्या वस्तू ठेवल्यास शुभ फल प्राप्त होते, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील वातावरण आनंददायी व मंगलमय बनते.

NEXT: जगातील सर्वात जुन्या Currency बद्दल तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

येथे क्लिक करा