Diwali 2025: नरक चतुर्दशी कधी आहे? 'या' दिवशी होणाऱ्या परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Dhanshri Shintre

दिवाळीचा सण

दिवाळीचा सण येण्याची उत्सुकतेने सर्वजण वाट पाहतात. या सणापूर्वी धनत्रयोदशी आणि नरक चतुर्दशी मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात.

नरक चतुर्दशी

नरक चतुर्दशीला रूप चतुर्दशी किंवा काली चौदस म्हणूनही ओळखले जाते. २०२५ मध्ये धनत्रयोदशी १८ ऑक्टोबरला, तर नरक चतुर्दशी १९ ऑक्टोबरला साजरी होणार आहे.

नरकासुराचा संहार

धार्मिक श्रद्धेनुसार, नरक चतुर्दशीशी अनेक आख्यायिका जोडल्या आहेत. असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीकृष्णाने राक्षस नरकासुराचा संहार केला होता.

नरकासुराचा वध

दिवाळीच्या एक दिवस आधी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, त्यानंतर नरक चतुर्दशी साजरी होऊ लागली. हिंदू धर्मात या दिवसाचे खास महत्त्व आहे.

पापांचा नाश

नरक चतुर्दशीच्या दिवशी दान व उपवास केल्याने पापांचा नाश होतो आणि आत्म्याला मोक्षप्राप्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा मानली जाते.

काली चौदस

नरक चतुर्दशीला काली चौदस म्हणूनही ओळखले जाते आणि या दिवशी देवी कालीची आराधना करून तिचे आशीर्वाद घेतले जातात.

पहाटे स्नान

नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे स्नान करणे, यमराजाला अर्घ्य देणे आणि संध्याकाळी दिवे दान करणे शुभ मानले जाते.

१४ दिवे लावणे

नरक चतुर्दशीच्या संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वारावर दक्षिण दिशेकडे तोंड असलेले १४ दिवे लावणे अत्यंत शुभ आणि पारंपरिक मानले जाते.

अकाली मृत्यूचे संकट

असे मानले जाते की नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवे दान केल्याने कुटुंबावरचे अकाली मृत्यूचे संकट दूर होते आणि आयुष्यात शांती येते.

NEXT: धनत्रयोदशीच्या दिवशी घरात कोणत्या गोष्टी आणल्यास मिळते संपत्ती आणि समृद्धी?

येथे क्लिक करा