Manasvi Choudhary
सणांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळी या सणात कंदिलाला विशेष महत्व आहे..
दिवाळीमध्ये घराची शोभा वाढवणाऱ्या या कंदिलाच्या मार्केटमध्ये विविध डिझाइन्स उपलब्ध आहेत.
साड्यांवर असलेल्या आकर्षक डिझाइन्स, जरतारीचा मोर, वेलीच्या डिझाइन्सपासून तयार करण्यात आलेल्या कंदिलांना चांगली पंसती मिळते.
घरातील पैठणी, म्हैसूर सिल्क, टंचोई सिल्क, बंगळुरू सिल्क, इरकली, पॉलिकॉट आदी साड्यांपासून कंदील तयार करा. एका साडीपासून चार ते पाच कंदील सहज तयार होतात.
साडीपासून कंदील बनवण्यासाठी प्रथम साडीचा 80 ते 100 सेटिंमीटरचा कापड घ्या.
साडीचा कापड मध्यम आकाराच्या खोक्याला चारही बाजूने गुंडाळून घ्या.
चारही बाजूंच्या कोपऱ्यावर दोन ते अडीच सेमी जागा सोडा. त्यानंतर चारही बाजूने चौकोन तयार होईल.
चौकोनाला गुंडाळलेला साडीचा कापड सैल पडणार नाही यासाठी चारही बाजूच्या कोपऱ्याला स्टॅपलर मारा. खणाचे काठ खालच्या बाजूनेच येतील हे लक्षात असु द्या.
आकाश कंदीलचा साचा तयार झाल्यावर डिझाईन म्हणून तुम्ही साडीवर असलेल्या नक्षी, पॅच, मोती तसेच वेगवेगळ्या रंगाचे स्टोन लावू शकता.
आकाश कंदील आकर्षक दिसण्यासाठी चारही बाजून डिझाईन लेस लावा.