Shruti Vilas Kadam
डिंक, गूळ, गहू पीठ, तूप, सुके मेवे (बदाम, काजू), खसखस, वेलची पावडर.
कढईत तूप गरम करून डिंक तळून घ्या. तो फुलून खुसखुशीत झाला की बाजूला काढा.
त्याच कढईत गव्हाचे पीठ तूपात छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
वेगळ्या भांड्यात थोड्या तुपात गूळ वितळवून घ्या, गुळात गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या.
भाजलेले पीठ, डिंक, सुके मेवे आणि वेलची पावडर गुळात मिसळा.
मिश्रण थोडे कोमट असताना हाताने लाडू वळून घ्या.
हे लाडू थंड झाल्यावर महिनाभर हवाबंद डब्यात ठेवा. प्रसूतीनंतर विशेषतः खाण्यास उपयुक्त आहेत.