ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
'दिल दोस्ती दुनियादारी’, ‘दिल दोस्ती दोबारा’ मालिकांतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे स्वानंदी टिकेकर.
या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
'अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेत स्वानंदी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली.
नाटक- मालिकांमध्ये स्वानंदी तिच्या हटके अंदाजाने भाव खाऊन जाते.
स्वानंदी सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
या फोटोतील स्वानंदीच्या स्मितहास्याने चाहते घायाळ झाले आहेत
स्वानंदीची आई आरती अंकलीकर टिकेकर या उत्कृष्ट शास्त्रीय गायिका आहेत.