Dhanshri Shintre
तुम्ही कधी विचार केला आहे का? या फळाचे बिया आत नसून बाहेर का असतात.
आज आपण जाणून घेणार आहोत असे कोणते फळ आहे ज्याला बिया आत नाही तर बाहेर असतात.
स्ट्रॉबेरी हे गोड आणि आंबट फळ हिवाळ्यात येते, जे आपल्यापैकी सर्वांना खूप आवडते.
तुम्हाला माहीत आहे का की, स्ट्रॉबेरीच्या बिया आत नसून बाहेर असतात, हे एक अनोखे वैशिष्ट्य आहे.
संत्र, पपई, सफरचंद, डाळिंब, पेरू यांसारख्या फळांमध्ये आत बिया असतात, तर आंब्यात मोठी कोय असते.
स्ट्रॉबेरीच्या बाहेरील बिया खाल्ल्या जातात आणि त्यांच्यापासून नवीन स्ट्रॉबेरींची लागवड केली जाते.
स्ट्रॉबेरीच्या वर असलेल्या बिया १०० ते २०० पर्यंत असतात, ज्याचा उपयोग लागवडीसाठी केला जातो.
स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी फायद्याचे फळ आहे, त्यामुळे सर्वजण ते आवडीने खातात.