Shruti Vilas Kadam
हिऱ्यांचा सर्वप्रथम शोध भारतामध्ये लागला. इ.स.पूर्व ४थ्या शतकात भारत हे जगातील एकमेव देश होते जिथे हिर्यांची खाण सापडली होती.
गोलकोंडा (तेलंगणा), कृष्णा नदी परिसर व मध्य प्रदेशातील काही भागात प्राचीन काळी हिर्यांचे मोठे साठे होते.
'अर्थशास्त्र' आणि 'गरुड़ पुराण' यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये हिऱ्यांचा उल्लेख आहे. त्यामुळे भारतात त्याचा वापर खूप पूर्वीपासून होत होता.
भारत हिऱ्यांचा प्रमुख निर्यातदार देश होता. हे हिरे प्राचीन रोम, ग्रीस व चीनपर्यंत पोहोचले होते.
गोलकोंडा भागात सापडलेले हिरे जगप्रसिद्ध आहेत – उदाहरणार्थ कोहिनूर, होप डायमंड यांसारखे प्रसिद्ध हिरे याच भागातून मिळाले.
१७व्या शतकानंतर ब्राझील, आफ्रिका आणि रशिया येथेही हिर्यांच्या खाणी सापडू लागल्या. पण इतिहासात पहिला शोध भारतातच लागला.
भारतामध्ये हिऱ्यांचा केवळ सौंदर्य नाही, तर धार्मिक व आध्यात्मिकदृष्ट्याही वापर केला जात असे. त्यामुळे ही परंपरा इतर संस्कृतींपेक्षा वेगळी होती.