Diabetes Symptoms: त्वचेवर दिसणारे 'हे' दोन डाग मधुमेह होण्याचे देतात संकेत

Bharat Jadhav

शरीरात आणि शरीराबाहेर दिसतात लक्षणं

मधुमेह जडल्यावर शरीराच्या विविध भागांत अनेक लक्षणे दिसू लागतात. याची लक्षणे केवळ शरीराच्या आतच नाहीतर शरीराबाहेरही दिसून येतात. त्यांकडे दुर्लक्ष केल्यास ही स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

लक्षणांबाबत गैरसमज

या लक्षणांबाबत व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. सुमित कपाडिया यांनी माहिती दिली आहे. यात त्यांनी मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे पाहून लोक अनेकदा सामान्य त्वचेच्या समस्या समजण्याची चूक करतात. यामुळे समस्या अधिक गंभीर होते, तर या लक्षणांची वेळीच ओळख पटल्यास उपचारांमध्ये मदत होते.

मानेवर गडद रंगाचे डाग

जर मानेवर गडद रंगाचे डाग किंवा चट्टे दिसू लागणे. अनेकजण याला मळ समजतात. पण पाण्याने धुवूनही काढण्याचा प्रयत्न करत असाल आणि ते निघाले नसतील तर ती घाण नसते. वैद्यकीय भाषेत याला 'अकँथोसिस निग्रिकन्स' (Acanthosis Nigricans) असे म्हणतात. ही शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढल्याचे लक्षण असते.

त्वचेवर लहान मांसल गाठी (skin tags) दिसणे

जर तुमच्या त्वचेवर, विशेषतः मानेच्या किंवा घशाच्या आसपास लहान मांसल गाठी दिसू लागल्या, तर हे रक्तातील साखरेची पातळी वाढल्याचे लक्षण असू शकते.

साखर आणि इन्सुलिनची वाढ

डॉक्टरांच्या मते, त्वचेवर दिसणारे हे दोन्ही प्रकारचे डाग संकेत देतात की, रक्तातील साखर आणि इन्सुलिनच्या वाढलेल्या पातळीमुळे तुमच्या शरीरातील पेशींची वेगाने वाढ होऊ लागली आहे. इन्सुलिन आणि साखरेची पातळी कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

वारंवार लघवी होणे

हे मधुमेहाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. यावरून समजतं की, शरीरातील अतिरिक्त साखर बाहेर टाकण्यासाठी तुमच्या मूत्रपिंडांना अतिरिक्त मेहनत करावी लागते.

सतत तहान लागणे

ही देखील मधुमेहाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. वारंवार लघवी झाल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी शरीराला वारंवार तहान लागते.