Shreya Maskar
मधुमेही रुग्णांची साखरेची पातळी नियंत्रणात नसेल तर, अत्यंत धोकादायक असते. त्याचा परिणाम हृदयापासून ते मूत्रपिंडांपर्यंत (किडनी) सर्व गोष्टींवर होतो.
काही रुग्णांना पायांमध्ये मुंग्या येतात, परंतु लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. या समस्येकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. वैद्यकीय भाषेत याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात.
डायबेटिक न्यूरोपॅथी (Diabetic Neuropathy) म्हणजे रक्तातील साखरेमुळे मज्जातंतूंचे नुकसान होते, ज्याचा प्रामुख्याने पाय आणि हातांवर परिणाम होतो. डायबेटिक न्यूरोपॅथी ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये नसा कमकुवत होतात.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डायबेटिक न्यूरोपॅथी व्यक्तीच्या चालण्याच्या क्षमतेवर लक्षणीय परिणाम होतो. जेव्हा रक्तातील साखर दीर्घकाळ वाढलेली राहते, तेव्हा पायांच्या नसा खराब होतात, ज्यामुळे मेंदूला पायांकडून मिळणारे संकेत अपुरे किंवा चुकीचे मिळतात.
रक्तातील साखरेचे काटेकोर आणि सातत्यपूर्ण नियंत्रण हा मज्जातंतूंचे नुकसान टाळण्याचा किंवा ते लांबणीवर टाकण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि मज्जातंतूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो; त्यामुळे रक्तदाब योग्य पातळीवर राखा.
प्रक्रिया केलेले पदार्थ आणि अतिरिक्त साखर यांचे प्रमाण मर्यादित ठेवून धान्ये , भाज्या, फळे आणि 'लीन प्रोटीन' (कमी चरबीयुक्त प्रथिने) यांचा आहारात समावेश करण्यावर भर द्या. शारीरिक व्यायाम करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.