Raksha Bandhan 2025: सातासमुद्रापार परदेशात भावाला ऑनलाइन पद्धतीने पाठवा राखी; पर्याय वाचा

Dhanshri Shintre

अतूट प्रेमाचा उत्सव

रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहीण यांच्या अतूट प्रेमाचा उत्सव, जो त्यांच्या नात्यातील जिव्हाळ्याची भावना दर्शवतो.

रक्षाबंधन

रक्षाबंधनच्या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते, दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देते आणि भाऊ तिचे रक्षण व प्रेमाचं वचन देतो.

कोणते पर्याय?

भाऊ दूर शहरात किंवा परदेशात राहत असेल तर त्याच्यापर्यंत राखी पोहोचवण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे जाणून घ्या.

स्पीड पोस्ट

राखी वेळेत पोहोचवण्यासाठी स्पीड पोस्ट आणि रजिस्टर्ड पोस्ट उत्तम पर्याय आहेत. इंडिया पोस्ट दरवर्षी राखीसाठी खास लिफाफा उपलब्ध करून देते, जो सुरक्षित आणि विश्वासार्ह असतो.

कुरिअरचा वापर

ब्लू डार्ट, डीटीडीसी, दिल्लीवरी आणि एकार्टसारख्या कुरिअर कंपन्या जलद सेवा देतात आणि ट्रॅकिंग नंबरद्वारे पार्सलचे थेट ट्रॅकिंग शक्य होते.

ई-कॉमर्स साइट्स

Amazon, Flipkart, Ferns N Petals, IGP यांसारख्या साइटवर राखी, मिठाई, भेटवस्तू आणि वैयक्तिक संदेशांसह ऑर्डर करू शकता, ते थेट तुमच्या ठिकाणी पोहोचवतात.

राखी पाठवण्याचे सोपे मार्ग

आम्ही तुम्हाला अमेरिका, युके, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये राखी पाठवण्याचे सोपे मार्ग येथे सांगणार आहोत.

आंतरराष्ट्रीय सेवा

फेडेक्स, डीएचएल, अरामेक्स आणि इंडिया पोस्टच्या आंतरराष्ट्रीय सेवांमुळे राखी ७ ते १० दिवसांत सहज परदेशात पोहोचवता येते.

ऑनलाइन वेबसाइट्स

IGP, Rakhi.in, GiftstoIndia24x7, Amazon Global सारख्या ऑनलाइन वेबसाइट्सद्वारे परदेशात राखी पाठवणे सोपे पर्याय ठरू शकतात.

NEXT: रक्षाबंधनासाठी बहिणीला काय गिफ्ट द्याल? या खास आयडियांनी तिचं मन जिंका!

येथे क्लिक करा