ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम भजी खाण्याची प्रत्येकाची इच्छा होते. शिवाय या वातावरणात भजी खाण्याची मजा वेगळीच असते.
कांदा आणि बटाट्याची भजी ही नेहमीच घरी केली जाते. मात्र आता पावसाळ्यात तुम्ही ओव्याच्या पानांची भजी ट्राय केली का?
ओव्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने पचनासाठीही ती फायदेशीर ठरते.
ओव्याची पानं, बेसन, तांदळाचं पीठ, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, लाल तिखट, ओवा, मीठ, हळद, खाण्याचा सोडा, पाणी आणि तेल
एका मोठ्या भांड्यात बेसन आणि तांदळाचे पीठ घेऊन त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, लाल तिखट, हळद, ओवा आणि मीठ घालून मिश्रण चांगलं मिसळा. यामध्ये किंचित खाण्याचा सोडा टाका.
तेल चांगलं गरम करा. आता न एक ओव्याचे पान तयार केलेल्या पिठात दोन्ही बाजूंनी व्यवस्थित बुडवून घ्या आणि गरम तेलात सोडा.
मध्यम आचेवर सोनेरी तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भजी छान तळून घ्या. दोन्ही बाजूंनी चांगली भाजली जाईल याची खात्री करा. आता गरम भजी सर्व करा.