Deepika Padukone: दीपिका पदुकोण या वादग्रस्त चित्रपटांमुळे ठरतेय 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन'

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री दीपिका पदुकोणचे चित्रपट रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकतात.

Deepika Padukone | Saam Tv

हल्लीच पठाण या चित्रपटातील दीपिका पदुकोणच्या भूमिकेने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

Deepika Padukone | Saam Tv

पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे वादात सापडले आहे. या गाण्यात दीपिकाने भगवी बिकिनी घातली असून, या गाण्याला विरोध होत आहे.

Deepika Padukone | Saam Tv

यापूर्वी दीपिकाचा पद्मावत हा चित्रपट खूप वादात सापडला होता. चित्रपटात दीपिकाचे काही सीन्स चुकीच्या पद्धतीने दाखविल्याबद्दल निषेध करण्यात आला होता.

Deepika Padukone | Saam Tv

दीपिका आणि रणवीरच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटात इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवल्याने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.

Deepika Padukone | Saam Tv

दीपिका पदुकोणच्या 'राम लीला' चित्रपटाच्या नावावरूनही वाद झाला होता. यानंतर चित्रपटातील रोमँटिक सीनबद्दल वातावरण तापले होते.

Deepika Padukone | Saam Tv

कॉकटेल' चित्रपटात दीपिका पदुकोणने 'वेरोनिका'ची भूमिका साकारली होती. या चित्रपटादरम्यान अभिनेत्रीच्या ड्रेस आणि क्लीवेज शोवरून बरीच चर्चा रंगली होती.

Deepika Padukone | Saam Tv