Dhanshri Shintre
दौलताबाद किल्ल्याला पूर्वी देवगिरी असे नाव होते. यादव राजवंशाच्या काळात (१२व्या शतकात) याची निर्मिती करण्यात आली.
हा किल्ला डोंगराच्या टोकावर असल्यामुळे शत्रूला सहज जिंकता येत नसे. त्यामुळे तो अभेद्य किल्ला मानला जातो.
मोहम्मद बिन तुघलकने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला हलवली आणि याचे नाव बदलून दौलताबाद ठेवले.
किल्ल्यात पाण्याच्या गुहा व बोगदे होते, जे संरक्षणासाठी बनवले गेले होते. हे बोगदे शत्रूला फसवण्यासाठी उपयोगी ठरायचे.
किल्ल्याच्या चारही बाजूंनी मजबूत भिंती व तटबंदी असून त्याची उंची आणि जाडी शत्रूच्या हल्ल्याला परतवून लावणारी होती.
किल्ल्यातील ‘अंधारे’ नावाचा वाकडेतिकडे जाणारा बोगदा शत्रूला गोंधळवण्यासाठी प्रसिद्ध आहे.
दौलताबाद किल्ल्यात मेंढा तोफ नावाची प्रचंड तोफ आहे. ती त्या काळातील सामर्थ्य आणि संरक्षणशक्ती दाखवते.
किल्ल्याचे दरवाजे लोखंडी नख्या लावून बनवलेले होते, ज्यामुळे शत्रूचे हत्ती दरवाजा फोडू शकत नाही.