Sakshi Sunil Jadhav
महिलांना थंडीत डोक्यात कोंडा होण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात जाणवतात. त्यावर लोक महागड्या ट्रीटमेंटचा पर्याय निवडतात.
पुढे आपण आयुर्वेदिक उपाय जाणून घेणार आहोत. ज्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. शिवाय तुम्हाला केमिकलचाही वापर यामध्ये करायचा नसतो.
आयुर्वेदात दिलेल्या काही गोष्टींमुळे तुम्ही काळेभोर लांब केस मिळवू शकता. तसेच तुम्हाला भविष्यात केव्हाही कोंड्याच्या समस्या जाणवल्या तर तुम्ही त्यावर हा उपाय करू शकता.
कडुलिंबाच्या तेलात अॅंटीफंगल आणि अॅंटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. हे तेल रात्री झोपताना केसांना लावून ठेवा.
तुम्ही आवळा आणि शिकाकाईचा वापर कोंडा, केस गळती आणि केस वाढत नसल्यास करू शकता. याची पावडर किंवा शांम्पूचा वापर करावा.
मेथी केसांसाठी नेहमीच उत्तम मानली जाते. कारण यामध्ये असणारे अॅंटीफंगल गुणधर्म असतात. जे केसातला कोंडा कमी करतात.
अॅलोवेरा जेल तुमच्या केसांसाठी आणि स्कीनसाठीही फायदेशीर असतं. हे केसांवर २० ते ३० मिनिटं लावून ठेवा. मग केस धुवून घ्या.
केसांमधला कोंडा घालवण्यासाठी लिंबाचा रस केसांच्या मुळांना लावून ठेवावा. किंवा यामध्ये पाणी टाकून शॅम्पू ऐवजी हे पाणी वापरावं.
टी ट्रीमध्ये असणारे गुणधर्म केसांच्या अनेक समस्या कमी करतात. त्यामुळे त्याने अनेक प्रकारचे फंगस सुद्धा दूर राहतात.