Saam Tv
आज तुकाराम बीज आहे. कोणाशी विनाकारण शत्रुत्व घेऊ नये. तुकाराम महाराजांचा संदेश लक्षात ठेवा. शत्रू वाढतील, कामांमध्ये अडथळे येतील पण यशस्वीपणे पार कराल.
कलाकारांना चांगल्या संधी दिवसभरामध्ये मिळतील. आत्मविश्वासाने वावराल. शेअर्समधील गुंतवणुकीचे आपले निर्णय योग्य ठरतील.
जेवढे जमेल तेवढे इतरांना प्रेम द्याल. आज पाहुण्यांचे आगमन होईल. सर्व सुखांच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.
प्रेमामधून लाभ होतील. खरंतर इतरांकडून काही घेण्यापेक्षा आपल्याला द्यायला आवडते. आज भावंडांसाठी काहीतरी मोठ्या मनाने, दिलदारपणे गोष्टी कराल ज्याचा पुढील प्रगतीसाठी फायदा होईल.
सहज सोप्या आयुष्यात कधीतरी मिठाचा खडा असे काही दिवस असतात. आज कुटुंबीयांची जबाबदारी आपल्याला पेलावी लागेल. पण पैशाची आवक चांगली राहिल.
हसून गोष्ट मारून येणे आणि सातत्याने हरीत राहणे आपल्याला आवडते. आज वेगळी महत्त्वाकांक्षा आकांक्षा घेऊन दिवस आलेला आहे. स्वतःचा प्रभाव इतरांवर टाकण्यामध्ये यशस्वी व्हाल.
अनेक दिवस असे येतात की जे सातत्याने खर्च करायला भाग पाडतात. तसाच आजचा दिवस आहे. कदाचित दवाखाना, मोठे प्रवास आणि नाहक कटकटींसाठी पैसा खर्च करावा लागेल.
जेवढे जमेल तेवढे आज इतरांना समजून घ्याल. मग ते शेजारी असो मित्र असो किंवा नातेवाईक असो. मनातल्या गोष्टी बाहेर न दाखवता प्रेमाने व्यवहार करावा लागेल. दिवस लाभाचा आहे.
काही वेळा द्विधा मन असते की त्यामधून मार्ग काढणे अवघड जाते. पण आज सर्वांच्या सहकार्याने यावर मात कराल. कामाच्या ठिकाणी धावपळ वाढेल. यशाची मजल मारून न्याल.
शिव उपासना फलदायी ठरेल. तुकाराम बीज आहे. धर्म आणि अध्यात्मात विशेष सहभाग घ्याल. समाजकारणामध्ये रस निर्माण होईल. भाग्यकारक घटनांचा कालावधी आहे.
जोडलेली माणसे आज कामात येतील. कदाचित अडचणीच्या काळात कोणाचा तरी मदतीचा हात मिळेल. पण पारदर्शक व्यवहार ठेवणे आजसाठी फलदायी आहे.
प्रेमा तुझा रंग कसा? असा आजचा दिवस आहे. संसारामध्ये मशगुल व्हाल. मात्र साधेपणामुळे आणि भोळ्या स्वभावामुळे भागीदारीत फसणार नाही ना याची काळजी घ्या.