Manasvi Choudhary
दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्याची पारंपरिक प्रथा आहे.
मानवी मनोरे उभारण्याच्या या खेळास साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्यात आला आहे.
दहिहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना अपघात किंवा दुर्घटना होण्याची शक्यता असते
यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही शासनाने अपघातग्रस्त गोविंदांना शासकीय मदत आणि विमा संरक्षणही जाहीर केले आहे.
गोविंदांच्या विम्यासाठी १८ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम मंजूर केली आहे. विमा संरक्षणाचा कालावधी ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत लागू होईल
दहिहंडी दरम्यान गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास अथवा गंभीर जखमी झाल्यास हा शासकीय विमा कवच गोविंदांना लागू होणार आहे.