Dadpe Pohe Recipe: सकाळच्या नाश्त्याला घरच्या घरी झटपट बनवा स्वादिष्ट दडपे पोहे; वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

२ कप जाड पोहे, १ बारीक चिरलेला कांदा, २ हिरव्या मिरच्या, २ टेबलस्पून किसलेले ताजे खोबरे, २ टेबलस्पून कोथिंबीर, १ टीस्पून साखर, चवीनुसार मीठ, १ लिंबाचा रस आणि २ टेबलस्पून शेंगदाणे.

Dadpe pohe Recipe

पोहे स्वच्छ करून मऊ करा

पोहे चाळणीत घेऊन हलकेच पाण्याचा शिडकावा करा. ५ ते १० मिनिटे झाकून ठेवा, म्हणजे पोहे मऊ होतील. जास्त पाणी टाकू नका.

Dadpe pohe Recipe

मसाला तयार करा

मोठ्या भांड्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, किसलेले खोबरे, मीठ, साखर आणि लिंबाचा रस एकत्र करून चांगले मिक्स करा.

Dadpe pohe Recipe | Saam Tv

पोहे मिसळा

मऊ झालेले पोहे तयार मसाल्यात घाला. हलक्या हाताने सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत मिसळा, जेणेकरून पोहे तुटणार नाहीत.

Dadpe Pohe | yandex

फोडणी द्या

कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि शेंगदाण्यांची खमंग फोडणी तयार करा. ही गरम फोडणी पोह्यांवर घालून व्यवस्थित मिक्स करा.

Dadpe Pohe Recipe | yandex

दडपून ठेवा

तयार मिश्रणावर झाकण ठेवून १० ते १५ मिनिटे तसेच दडपून ठेवा. त्यामुळे सर्व मसाल्यांचा स्वाद पोह्यांमध्ये चांगला मुरतो.

Dadpe Pohe | yandex

सर्व्ह करण्याची पद्धत

दडपे पोहे सर्व्ह करताना वरून कोथिंबीर, खोबरे आणि थोडासा लिंबाचा रस घाला. गरम चहा किंवा ताकासोबत हे पोहे अधिक स्वादिष्ट लागतात.

Dadpe pohe Recipe

Badishep Water Benefits: वजन कमी ते ग्लोईंग स्किन; सकाळी कोमट पाण्यात बडीशेप टाकून प्यायल्याने मिळतात हे फायदे

Badishep Water Benefits | AI
येथे क्लिक करा