साम टिव्ही ब्युरो
'पुष्पा' या चित्रपटातील श्रीवल्ली अर्थात रश्मिका मंदानाच्या अदा आणि नखरेल अंदाजाच्या प्रेमात तरुणाई बुडाली आहे.
'नॅशनल क्रश' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रश्मिकाचा जन्म ५ एप्रिल १९९६ रोजी कर्नाटकात झाला.
क्लिन अॅन्ड क्लिअर फेस ऑफ द इयर २०१४ ची ती विजेती ठरली आणि येथून तिच्या करिअरला कलाटणी मिळाली.
कार्यक्रमात रश्मिकाला अक्षय कुमार आणि राणा डुग्गुबाटी यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
'किरिक पार्टी' हा रश्मिकाचा पहिला चित्रपट. तो २०१६ साली प्रदर्शित झाला होता. यानंतर तिने अनेक चित्रपटांत काम केले.
रश्मिकाच्या अभिनयाचा एक विशेष असा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर रश्मिका कायम सक्रिय असते.
रश्मिका मंदानाने अभिनय शैलीमुळं इंडस्ट्रीत स्वतःची खास अशी ओळख निर्माण केली आहे.
रश्मिकाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेला गुडबाय सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.