Sakshi Sunil Jadhav
प्रत्येकाच्या घरात ओला नारळ असतोच. याचा वापर पूजापासून भाजी, चटणी आणि मिठाईपर्यंत केला जातो. पण नारळ फोडल्यानंतर उरलेला भाग एका दिवसातच खराब होतो, वास येतो, बुरशी लागते. यावर एक खास ट्रिक जाणून घेऊयात.
नारळ फोडल्यानंतर आतला पांढरा गर हवेच्या संपर्कात येतो. त्यामुळे ओलावा, उष्णता, बॅक्टेरिया आणि बुरशी यामध्ये तो खराब लगेच होतो.
उन्हाळ्यात उष्ण आणि दमट हवामानात फोडलेला नारळ 2 ते 3 दिवसांतच त्याला आंबट वास येतो आणि तो खराब होतो.
साधं मीठ हे नैसर्गिक जंतुनाशक असतं. नारळाच्या तुकड्यांना मीठ चोळल्याने त्यातले बॅक्टेरिया आणि बुरशी वाढत नाही.
मोठ्या नारळाचे तुकडे करुन घ्या. कापून प्रत्येक तुकड्यावर थोडं मीठ लावा तो जास्त दिवस टिकतो.
नारळाचा गर किसून त्यात मीठ मिक्स करुन हवाबंद डब्यात ठेवा. चटणी किंवा भाजीसाठी तो लगेच वापरता येतो.
नारळ फ्रीजरमध्ये ठेवायचा असेल तर आधी मीठ लावा. त्याने त्याची चव आणि ताजेपणा टिकतो.
मीठ लावलेला नारळ नेहमी गराची बाजू खाली करून ठेवा. त्याने ओलावा साचत नाही आणि बुरशीचा धोका कमी होतो.
नारळाला विचित्र वास, चिकटपणा किंवा बुरशी लागली असेल तर तो अजिबात वापरू नका. याने आरोग्यास हानी पोहोचू शकते.