ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लग्नसमारंभ असो किंवा एखादा कार्यक्रम नवीन पारंपारिक लूकवर गजरा माळला नाही सौंदर्य काहीसं अपूर्णच वाटतं.
सगळ्यांना हवाहवासा वाटणारा तो मंद कोवळ्या फुलांचा गजरा सौंदर्य खुलवतो.
यामुळे स्त्रिया आवडीने केसांत गजरा हा माळतात.
यासह केसांच्या माध्यमातून डोक्यावरील उष्णता ही गजरा शोषून घेते.
महत्वाचे म्हणजे, फुलांना अतिशय पवित्र मानले जाते आणि हिंदू धर्मातील लोक पूजेच्या वेळी देवांना फुले अर्पण करतात. यामुळेच केसांना फुलं लावल्याने घरात सुख-समृद्धी येते.
महिला सणासमारंभात गजऱ्याचे दागिने म्हणून देखील वापरतात.
गजऱ्याच्या दागिण्यांनी सौंदर्याला एक वेगळीचा छटा येते आणि सौंदर्य खुलवून दिसते.