Vat Purnima 2023 : पहिल्यांदाच वटपौर्णिमा साजरी करताय? तर हे वाचाच!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सण- उत्सव

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण, उत्सव यांना विशेष महत्त्व आहे. त्यासोबतच त्याच्यामागे काही अध्यात्मिक आणि धार्मिक कारणंदेखील आहेत.

Hindu Festival | Saam Tv

वटसावित्री पौर्णिमा

हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. विशेष म्हणजे पहिली वटपौर्णिमा नववधूंसाठी खास असते.

Vat Purnima 2023 | Saam Tv

वडाची पूजा

आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी महिला उपवास करतात. सोबतच वडाच्या झाडाची पूजाही करतात.

Vat Purnima 2023 | Saam Tv

पूजा जा कशी करायची? कोणतं साहित्य?

त्यामुळे या दिवशी त्या नटूनथटून वडावर पुजा करण्यासाठी जातात. म्हणूनच, ही पूजा कशी करायची? किंवा या पुजेला कोणतं साहित्य लागतं? याविषयी जाणून घ्याSaam Tv

Vat Purnima 2023 | Saam Tv

साहित्य -

२ हिरव्या बांगड्या, हळद-कुंकू, एक गळसरी, पुजेचं वस्त्र, सुपारी, विड्याची पाने, पैसे,अत्तर, पंचामृत, कापूर, गुळ-खोबऱ्याचा नैवेद्य, ५ फळं, सती मातेचा फोटो किंवा सुपारी, दोरा.

Saam Tv

Vat Purnima 2023 | Saam Tv

पुजा विधी

वडाच्या झाडाची पुजा करावी प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. त्यावर हळद-कुंकू , अक्षता वाहून पूजा करावी.

Hindu Rituals | Saam Tv

पूजा

त्यानंतर वडाच्या मुळाची व सती मातेची याच पद्धतीने पूजा करावी. त्यानंतर सती मातेजवळ विड्याची पानं ठेवून त्यावर पैसा-सुपारी ठेवावी.

Vat Purnima 2023 | Saam Tv

पाच फळे- नैवेद्य

हिरव्या बांगड्या, गळसरी, पुजेचं वस्त्र, पाच फळं ठेवावीत. त्यानंतर गुळ-खोबरं व पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. सारं काही व्यवस्थित झाल्यावर कापूर आरती करावी.

Vat Purnima 2023 | Saam Tv

उपवास

पूजा झाल्यावर स्त्रियांनी वडाला दोरा गुंडाळात सात फेऱ्या माराव्यात.दरम्यान, या दिवशी स्त्रियांनी पूर्ण दिवस उपवास करावा व दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा.

Vat Purnima 2023 | Saam Tv

NEXT: Priyadarshini Indalkar: तू फुलराणी चाहत्यांच्या हृदयाची राणी

येथे क्लिक करा...